esakal | मुंबईत पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त अँटीबॉडीज
sakal

बोलून बातमी शोधा

Corona virus

मुंबईत पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त अँटीबॉडीज

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने तिसरा सिरो सर्वे केला आहे. या सिरो सर्वेत झोपडपट्टी व्यतिरिक्त अन्य इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीजची निर्मिती झाल्याचे दिसून आले आहे. यात आणखी एक वेगळी बाब म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाची लागण होण्यामध्ये सुद्धा असचा पॅटर्न दिसून आलाय. पुरुषांचे ५८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले. तेच स्त्रियांचे ४२ टक्के नमुने पॉझिटिव्ह होते.

२४ वॉर्डातून १०,१९७ रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यातील ३६.३० टक्के नमुने सिरो-पॉझिटिव्ह म्हणजे अँटीबॉडीज आढळल्या. पहिला सिरो सर्वे जुलै २०२० मध्ये तीन वॉर्डमध्ये करण्यात आला होता. दुसरा सिरो सर्वे त्याच तीन वॉर्डमध्ये ऑगस्ट महिन्यात करण्यात आला. तिसऱ्या सिरो सर्वेसाठी महापालिकेचे दवाखाने आणि खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतून रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले.

हेही वाचा: मुंबईत १८ ते ४४ वयोगटासाठी १ मे पासून लसीकरण नाही?

गोळा केलेल्या नमुन्यांपैकी पुरुषांमध्ये ३५.०२ टक्के सिरो पॉझिटिव्हीटी आणि महिलांमध्ये ३७.१२ टक्के अँटीबॉडीज आढळून आल्या. झोपडपट्टी नसलेल्या भागातील खासगी प्रयोगशाळेतून गोळा केलेल्या नमुन्यांपैकी २८.५ टक्के नमुन्यांमध्ये सिरो पॉझिटिव्हीटी आढळली. झोपडपट्टी भागात असणाऱ्या महापालिका दवाखान्यातून गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ४१.६ टक्के अँटीबॉडीज आढळल्या पहिल्या सर्वेत झोपडपट्टयांमध्ये ५७ टक्के अँटीबॉडीज आढळल्या होत्या.

"कोविडचा फैलाव रोखण्यासाठी आम्ही अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजत आहोत. हे करत असताना काही वैज्ञानिक माहिती गोळा करणे सुद्धा आवश्यक असते. त्यामुळे आम्ही तिसरा सिरो सर्वे केला" असे एका महापालिका अधिकाऱ्याने सांगितले.

loading image
go to top