डॉक्टरांची कमाल! ठाण्यात महिलेच्या पोटातून काढला चक्क 10 किलो वजनाचा ट्यूमर

महाराष्ट्रातील ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामधील डॉक्टरांनी अशक्य वाटणारे ऑपरेशन यशस्वीरित्या पुर्ण करून एका महिलेला जीवनदान दिले आहे.
thane Hospital
thane HospitalEsakal
Updated on

महाराष्ट्रातील ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामधील डॉक्टरांनी अशक्य वाटणारे ऑपरेशन यशस्वीरित्या पुर्ण करून एका महिलेला जीवनदान दिले आहे. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून दहा किलो वजनाचा ट्युमर (गाठ) शस्त्रक्रिया करून यशस्वीरित्या बाहेर काढला आहे. डॉक्टरांसाठी ही शस्त्रक्रिया सोपी नव्हती पण त्यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सक्षमपणे पार पाडली. याबाबत सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर येथील एक भाजी विक्रेती महिला पोटदुखीमुळे हैराण झाली होती. या महिलेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेणे या महिलेला शक्य नव्हते. त्यामुळे ती या दुखण्याकडे दुर्लक्ष करत राहिली. वेदना सहन न झाल्याने तिने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल गाठले. त्यानंतर डॉक्टरांनी या महिलेला उपचारांसाठी उल्हासनगर येथील रूग्णायलयात दाखल करण्यात आले. तर पुढील उपचारांसाठी डॉक्टरांनी ठाण्यातील सिव्हील रूग्णालयात पाठवलं. तपासणी केली असता महिलेच्या पोटात मोठी गाठ असल्याचे दिसून आले.

thane Hospital
Eknath Shinde Eye Surgery : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया!

चाचणीमध्ये 10 किलोची आढळली गाठ

रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून सुमारे 10 किलो वजनाची गाठ काढण्यात आली. हे ऑपरेशन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.श्रेया शेळके यांनी यशस्वीरित्या पार पाडून या महिलेला नवजीवन दिले.

thane Hospital
Drunk And Drive: मद्यधुंद कारचालकानं महिलेला चिरडलं अन् स्कुटर 1 किमीपर्यंत नेली फरफटत! व्हिडिओ व्हायरल

दोन तास चालली शस्त्रक्रिया

महिलेच्या गर्भाशयाच्या सोनोग्राफी आणि सीटी स्कॅनमध्ये महिलेच्या पोटात गाठ असल्याचे समोर आले. त्यामुळे ही शस्त्रक्रिया खूपच अवघड होती परंतु रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. सुमारे दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी गाठ काढली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.श्रेया शेळके, भूलतज्ज्ञ प्रियांका महांगडे व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

thane Hospital
Anandachi Shidha Fraud: आनंदाचा शिधा’त गैरव्यवहार! पुरवठा शाखेतील खासगी व्यक्तीकडे पैसे जमा, पाथर्डीतील प्रकार

पोटात गाठ का होते?

शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले की, शरीरात काही बदल होत असल्याने महिलांच्या पोटात गाठ होते. पोटदुखी, अपचन, नैसर्गिक क्रिया करण्यास त्रास होणे इत्यादी लक्षणे आढळतात. कधी कधी ही गाठ कर्करोगाचीही असू शकते. त्यामुळे ही गाठ वैद्यकीय प्रयोग विभागात तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com