esakal | सावंतांना तज्ज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का? मेट्रो कारशेडप्रश्‍नी आशीष शेलार यांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतांना तज्ज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का? मेट्रो कारशेडप्रश्‍नी आशीष शेलार यांचा सवाल

मुंबई मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने कांजूरमार्गच्या जागेचा विचार केला होता आणि त्याचा पुरावा म्हणजे त्या वेळी अश्‍विनी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते, असे सांगून सचिन सावंत यांनी स्वत:चेच हसे करून घेतले आहे.

सावंतांना तज्ज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का? मेट्रो कारशेडप्रश्‍नी आशीष शेलार यांचा सवाल

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबई मेट्रोसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने कांजूरमार्गच्या जागेचा विचार केला होता आणि त्याचा पुरावा म्हणजे त्या वेळी अश्‍विनी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते, असे सांगून सचिन सावंत यांनी स्वत:चेच हसे करून घेतले आहे. हा संपूर्ण घटनाक्रम महाविकास आघाडी सरकारच्या सौनिक कमिटीच्याच अहवालात नमूद असून, कांजूरमार्ग नव्हे तर आरेचीच कशी योग्य जागा आहे, हे याच सरकारच्या समितीने सांगितले आहे. त्यामुळे मनोज सौनिक कमिटीपेक्षाही त्यांचा जास्त अभ्यास आहे का, असा प्रश्‍न निर्माण होत असल्याची टीका भाजपचे नेते तथा आमदार ऍड. आशीष शेलार यांनी केली आहे. 

BMC आयुक्त इक्बालसिंह चहल यांची अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती

मुळात फडणवीस सरकारने कांजूरमार्ग जागेच्या पर्यायाची शक्‍यता पडताळून पाहण्याचे ठरविले होते. त्या वेळी न्यायालयातून स्थगिती हटविण्यासाठी परवानगी दिल्यानंतर भिडे यांनी ते पत्र लिहिले; मात्र असे सिलेक्‍टिव्ह पत्र दाखवून काय उपयोग? त्याच काळात भिडे यांनी नगरविकास विभागाला न्यायालयातील प्रलंबित दाव्यांबाबतची माहितीही दिली. त्यात सरकारी वकिलांनी 2661 कोटी न्यायालयात जमा करावे लागतील, असा स्पष्ट अभिप्राय दिला होता. डिसेंबर 2016 पर्यंत न्यायालयातील स्थगिती मागे घेण्यासाठी भरघोस प्रयत्न केले; पण जेव्हा हे शक्‍य नाही, असे लक्षात आले आणि दुसरीकडे मेट्रोचे काम वेगाने पुढे गेले, तेव्हा मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या विनंतीवरून आरेच्या जागेची निवड केली गेली. शिवाय 1000 झाडे वाचविण्यासाठी कार डेपो 30 हेक्‍टरऐवजी 25 हेक्‍टरमध्ये करण्याचे नियोजन केले गेले, असेही शेलार यांनी म्हटले आहे. 

Does sachin Sawant have more study than the expert committee Ashish Shelars question on Metro car shed