
एन 95 सारखा मास्क लावून धावणेच काय चालणेही योग्य नाही. असे पर्लमोकेअर रिसर्च अँड एज्यूकेशन फांऊडेशनचे संचालक डॉ. संदिप साळवी यांनी सांगितले.
मुंबई : मुंबईत 'मिशन बिगिन अगेन'ला सुरवात झाली आणि लॉकडाऊन शिथील झाल्याझाल्या मास्क लावून सकाळच्या वेळी चालणाऱ्या आणि धावणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, मास्क लावून केला जाणारा व्यायाम तुमच्या जिवावरही बेतू शकतो. त्यामुळे धावण्याचा व्यायाम करुच नये असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
एन 95 सारखा मास्क लावून धावणेच काय चालणेही योग्य नाही. असे पर्लमोकेअर रिसर्च अँड एज्यूकेशन फांऊडेशनचे संचालक डॉ. संदिप साळवी यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारचा मास्क लावून धावणे योग्यच नाही. तर सर्जिकल किंवा कापडी मास्क लावून चालण्याचा व्यायाम करण्यास हरकत नाही. पण तेही 10 ते 15 मिनीटापेक्षा जास्त नसावे असेही ते सांगतात.
मोठी बातमी - धक्कादायक ! बिल्डिंग मधील २५ जणांसोबत ज्यांच्या खांद्यावर कोरोना पळविण्याची जबाबदारी त्याही कोरोना पॉझिटिव्ह...
मास्क लावून श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे पळणे जास्त काळ चालणे यामुळे शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होऊ शकते. असेही डॉ. साळवी यांनी सांगितले. याचा शरिरावर विपरीत परीणाम होण्याची शक्यताही ते वर्तवतात.
सामान्य पणे माणूस मिनीटाला 18 ते 24 श्वास घेतो. धावण्यामुळे ही गती दुप्पट वाढते. मास्कमुळे श्वास घेणे सोडणे यात अडचणी येऊन गुदमरु शकतो. तसेच चक्करही येऊ शकते. त्यामुळे मास्क लावून धावण्याचा व्यायाम करणे योग्य नाही असे छातीविकारतज्ज्ञ डॉ.मनोज म्हस्के सांगतात. तर चालणेही मार्यादितच स्वरूपात असणं गरजेचे आहे. मास्क लावून नेहमी सारखे चालण्याचा व्यायाम करणेही चांगले नाही त्यामुळे हे प्रमाणही कमी करायला हवे असेही ते सांगतात. त्याचबरोबर मास्क लावल्याने एक प्रकारचे मानसिक दडपणही असते. त्याचा त्रासही होऊ शकतो असंही डॉ. म्हस्के यांचं म्हणणं आहे.
मोठी बातमी - भीषण ! 'त्या' रुग्णालयात 90 मिनिटांत सात जणांचा मृत्यू, कारण ऐकाल तर धक्का बसेल...
श्वसनाचे विकार, ह्रद्यविकार, मधुमेह असे आजार असलेल्यांनी मास्क लावून चालणेही योग्य नाही. मास्क लावून केलेला व्यायाम त्यांच्या जिवासाठी घातक ठरु शकतो, असा सल्लाही डॉक्टर देतात. त्यामुळे बैठे व्यायाम करणेच या काळात चांगले असल्याचे सांगण्यात येतंय.
जाणून घ्या काय करायला हवे ?
doing exercise or jogging with mask on is harmful for respiration read full news