esakal | भीषण ! 'त्या' रुग्णालयात 90 मिनिटांत सात जणांचा मृत्यू, कारण ऐकाल तर धक्का बसेल...
sakal

बोलून बातमी शोधा

भीषण ! 'त्या' रुग्णालयात 90 मिनिटांत सात जणांचा मृत्यू, कारण ऐकाल तर धक्का बसेल...

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एका रुग्णालय आणि मुंबई महापालिकेविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जोगेश्वरीमधल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मुलीनं आणि सोमय्या यांनी एकत्रित पालिकेविरुद्ध तक्रार दाखल केली.

भीषण ! 'त्या' रुग्णालयात 90 मिनिटांत सात जणांचा मृत्यू, कारण ऐकाल तर धक्का बसेल...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एका रुग्णालय आणि मुंबई महापालिकेविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जोगेश्वरीमधल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मुलीनं आणि सोमय्या यांनी एकत्रित पालिकेविरुद्ध तक्रार दाखल केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रूग्णालयात बिघडलेल्या ऑक्सिजन सिस्टममुळे 90 मिनिटांत सात लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकांचे मृत्यू झाले. त्यामुळे व्यवस्थापनाविरोधात आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. 

या रुग्णालयात 30 मे रोजी मृत्यू झालेले दादा भामरे यांची मुलगी नंदा भामरे यांनी सांगितलं की, दादा भामरे यांनी 27 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 29 मे रोजी आम्हाला सांगण्यात आलं की त्यांची कोविड-19ची टेस्ट पॉझिटिव्ह आली. माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितले की कोणीही त्याची काळजी घेत नाही. 30 मे रोजी आम्हाला सांगण्यात आले की त्याचा मृत्यू झाला होता आणि ते व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची तपासणी व्हावी असं मला वाटतं असल्याचं भामरे यांनी म्हटलं आहे. 

मोठी बातमी मुंबईत नालेसफाई फक्त 40 टक्केच; भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला ठाकरे सरकारवर आरोप..

90 मिनिटांत सात जणांचा मृत्यू

ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या यंत्रणेत बिघाड असल्यामुळे 30 मे रोजी ट्रामा सेंटरमध्ये 90 मिनिटांत सात लोकांचा मृत्यू झाला. आम्ही बीएमसी आणि रुग्णालय व्यवस्थापनाविरूद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. तसंच त्यांच्या विरोधात  आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे. 

33 वर्षीय मोहम्मद सादिक शेख यांच्या कुटुंबीयांनीही सांगितलं की ऑक्सिजन सिस्टममध्ये बिघाड असल्यामुळे त्याच रुग्णालयात मोहम्मद यांचा मृत्यू झाला. त्यांना 14 मे रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मोहम्मद त्यांनी कुटुंबियांनी सांगितलं की, रुग्णालयात दाखल केल्यानंर दुसर्‍या दिवशी त्याने दम लागल्याची तक्रार केली आणि माझी कोणीही काळजी घेत नसल्याचं म्हटलं. आम्ही रुग्णालयामध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण रुग्णालयाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. 18 मे रोजी त्याचा मृत्यू झाला.

मोठी बातमी -  आनंदाची बातमी! हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने...

मोहम्मद व्हेंटिलेटरवर होता असं डॉक्टरांनी सांगितलं. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हे घडले असल्याचं मोहम्मद सादिक यांचे मेहुणे मोहम्मद हुसेन शेख म्हणाले. सामाजिक कार्यकर्ते निजामुद्दीन शेख यांनी सांगितलं की, या संदर्भात बीएमसी आयुक्तांसह अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. मात्र अद्याप पालिकेकडून काही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान आम्ही यासंदर्भात चौकशी करत असल्याचं दिंडोशी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यानं सांगितलं.

within 90 minutes seven patients lost their life horrible indecent registered at jogeshwari

loading image