वर्क फ्रॉम होम करतायत? दिवसभर बेडवर बसून तासंतास काम करणं योग्य नाही, काय होतं वाचा...

वर्क फ्रॉम होम करतायत? दिवसभर बेडवर बसून तासंतास काम करणं योग्य नाही, काय होतं वाचा...

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे . तसंच ज्यांना शक्य आहे ते घरूनच काम करत आहेत. आता वर्क फ्रॉम होम म्हंटलं की तुम्ही गादीवर निवांत बसून काम करत असाणार. मात्र तुमचं दिवसभर गादीवर बसून काम करणं तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं.

तुम्ही जर घरी निवांत गादीवर बसून आणि  मांडीवर लॅपटॉप ठेऊन काम करत असाल तर तुमच्या शरीरावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे तुम्हाला पाठीच्या कण्याचा त्रास होऊ शकतो किंवा तुमच्या झोपेवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

बरेचदा तुम्ही गादीवर बसून लॅपटॉपवर काम करत असाल तर तुमची मान सतत खाली असते तुमच्या मानेला कुठलाही सपोर्ट मिळत नाही. त्यामुळे तुमच्या पाठीच्या कण्यावर ताण येतो.

स्लिप डिस्कची समस्या होते निर्माण: 

सतत एकाच ठिकाणी गादीवर खाली बसून काम केल्यामुळे तुम्हाला पाठीच्या कण्याचा त्रास होऊ शकतो. ज्यामध्ये तुम्हाला स्लिप डिस्क होऊ शकतो. यामध्ये तुमची कण्याच्या डिस्क पाठीच्या कण्याच्या किंचित बाहे येऊ शकतात. मात्र त्यामुळे तुम्हाला प्रचंड अंगदुखी आणि पाठदुखी सहन करावी लागू शकते. यामुळे तुम्ही कुठेही चालू शकत नाही आणि तुमच्या पायवर सूज येते.

तुमच्या झोपेवरही होऊ शकतो गंभीर परिणाम:

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही घरी गादीवर बसून काम करता तेव्हा तुमचा मेंदू काम आणि झोप यामध्ये लवकर फरक करू शकत नाही त्यामुळे तुमची झोप अपूर्ण होऊ शकते किंवा तुमचं कामात लक्ष लागत नाही. तसंच तुम्हाला कामामध्येही झोप येऊ शकते.

गादीवर बसून काम करताना अशी घ्या काळजी:

  • काम करण्यासाठी तुम्ही स्टडी टेबलचा वापर करू शकतात 
  • पाठीचा कणा ताठ ठेऊन सरळ बसा.
  • पाठीला उशीचा आधार द्या.
  •  तुम्हाला खाली बघावं लागणार नाही लॅपटॉप इतक्या उंचीवर ठेवा.
  • तुमचं डोकं,मान आणि पाठीचा कणा एका सरळ रेषेत ठेवा.
  • पाय सरळ ठेऊन बसा किंवा गुडघ्यांपासून मोडून बसा.
  • भरपूर वेळ एकाच स्थितीत बसू नका.
  • काम सुरू करायच्या आधी शरीराला थोडं स्ट्रेच करा.
  • दररोज ३० मिनिटं व्यायाम करा.

यामुळे तुम्ही घरून काम करूनही निरोगी आणि फिट राहू शकता.

doing work from home how working from your bed will affect your body read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com