"होय, आपण कोरोनाच्या स्टेज ३ मध्ये आहोत. ही स्टेज ३ ची सुरवात आहे"

"होय, आपण कोरोनाच्या स्टेज ३ मध्ये आहोत. ही स्टेज ३ ची सुरवात आहे"

मुंबई - "होय, आपण कोरोनाच्या स्टेज ३ मध्ये आहोत. मात्र ही स्टेज ३ ची सुरवात आहे." हे आम्ही नाही म्हणत,  हे म्हणतायत डॉक्टर गिरधर ज्ञानी. डॉक्टर गिरीधर ज्ञानी हे COVID-19 रुग्णालयांच्या टास्क फोर्सचे समन्वयक आहेत. डॉक्टर ज्ञानी यांनी इंग्रजी वेबसाईट 'द क्विन्ट' ला दिलेल्या मुलाखतीत ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

डॉक्टर ज्ञानी हे 'असोशिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर' या NGO चे संस्थापक आहेत. ४  मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्ययंत्रणा पुरावणाऱ्या अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा संपर्क साधला होता. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये डॉक्टर ज्ञानी हे देखील उपस्थित होते. नीती आयोगाने भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही टास्क फोर्सेसची नियुक्ती केलीये. COVID-19 रुग्णालयांच्या टास्क फोर्सचा यामध्ये  समावेश आहे. 

डॉक्टर ज्ञानी यांच्याकडे 'क्वालिटी मॅनेजमेंट' या विषयातील PhD पद्वी. डॉक्टर ज्ञानी हे एक NGO देखील चालवतात. 'द असोशिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर' या NGO च्या माध्यमातून डॉक्टर ज्ञानी हे सरकारला आरोग्यविषयक धोरणं आखण्यात सल्लामसलत करत असतात.       

कोरोना व्हायरसचा सामना कारण्यासाठी भारतात  रुग्णालये उभारण्याची गरज आहे. अशात कोरोना इस्पितळ  उभारणीसाठी आपल्या हातात अत्यंत कमी वेळ उरलाय. येत्या काही आठवड्यांमध्ये भारतासारख्या देशात कोरोना व्हायरसने होणाऱ्या COVID19 च्या रुग्णांचा आकडा कधीही वाढू शकतो. आपल्याकडे रुग्णालयं आणि प्रशिक्षित वैद्यकीय स्टाफ देखील नसल्याची खंत डॉक्टर गिरीधर ज्ञानी यांनी 'द क्विन्ट'च्या मुलाखतीत बोलून दाखवली आहे.      

स्टेज ३ म्हणजे कोरोनाचा 'कम्युनिटी स्प्रेड' होतो. कोरोनाच्या संसर्गाच्या विविध टप्प्यांमधील 'स्टेज ३' हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जाते. या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग नक्की कुणामुळे झालाय हे समजणं अत्यंत कठीण होतं. डॉक्टर ज्ञानी यांच्या माहितीप्रमाणे पुढील १० दिवस हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कारण ज्यांना कोरोना झालाय अशा व्यक्ती पुढील ५ ते १० दिवसात कोरोनाची लक्षणं दाखवायला आता करतील असं डॉक्टर ज्ञानी यांनी सांगितलंय. 

we are in stage three of corona virus says dr giridhar gyani who is convener of covid19 hospital task force 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com