डॉक्टर दाम्पत्याची 57 लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या डॉक्टर दांम्पत्याची 57 लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली.

Fraud News : डॉक्टर दाम्पत्याची 57 लाखांची फसवणूक

डोंबिवली - कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या डॉक्टर दांम्पत्याची 57 लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गाळे खेरदीच्या व्यवहारात ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मोहनलाल पटेल, जतिन पटेल, अंकित पटेल व मनसुख वसानी या चार विकासकांवर महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेतील चिखलेबाग परिसरात डॉ. पुरुषोत्तम व डॉ. प्रज्ञा टिके राहतात. हे दोघेही कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय विभागात सेवा देत आहेत. कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा येथील श्री मूर्ती सोसायटीमधील दोन व्यापारी गाळे संजय पटेल यांनी राजेशकुमार शर्मा यांना विक्री केले होते.

या दोन्ही गाळ्यांची विक्री झाल्याचे माहित असतानाही चारही आरोपींनी आपआपसात संगनमत करुन ते दोन्ही गाळे डॉ. पुरुषोत्तम आणि डॉ. प्रज्ञा टिके यांना 1 कोटी 45 लाख रुपयांना विक्री केले. या गाळ्यांचा नोंदणीकरण व्यवहार आरोपींनी करुन दिला. अशाप्रकारे डॉ. पुरुषोत्तम आणि डॉ. प्रज्ञा यांची आरोपींनी संगनमत करुन 56 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केली. डॉक्टर दाम्पत्याने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. दाखल तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत पोलीस उपनिरीक्षक डी. एम. वाघमारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.