
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील (Dombivali west) म्हात्रे वाडी परिसरातील त्रिभुवन ज्योत या इमारतीचा ओपन टेरेसचा काही भाग (building collapse) सोमवारी सकाळी कोसळला. याची माहिती मिळताच पालिका अधिकाऱ्यांनी (kdmc authorities) घटनास्थळी जात पहाणी केली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी (no casualties) झालेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय (precautions) म्हणून पालिका प्रशासनाने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट (structural audit) करून निर्णय घेणे व तोपर्यंत रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणे अशा सूचना दिल्या आहेत.
डोंबिवली पश्चिमेला त्रिभुवन ज्योत ही तळ अधिक चार मजली इमारत आहे. 28 ते 29 वर्षांपूर्वी ची ही इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील कॅन्टीलीव्हर म्हणजे ओपन टेरेस चा भाग हा खालच्या बाल्कनीवर व रस्त्यावर सोमवारी सकाळी अचानक कोसळला. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही. घटनेचे गांभिर्य लक्षात घेत नागरिकांनी त्वरित इमारत बाहेर धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच ह प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पहाणी केली. इमारतीची पाच वर्षापूर्वी दुरुस्ती करून घेतली असल्याचे यावेळी रहिवाशांनी अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र आज इमारतीचा काही भाग कोसळल्याने पालिकेने इमारतीला 265 ए कलमानुसार महापालिकेच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल ऑडिटर कडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची नोटीस दिली गेली. इमारतीचा भाग कोसळलेल्या ठिकाणच्या खालील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी सांगितले. 24 तासात स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाल्यावर त्यांनी रिपोर्टनुसार आवश्यक निर्णय घेऊन इमारत दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याबाबत ठरवायचे आहे अशा त्यांना सूचना देण्यात अली असल्याचेही गुप्ते यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.