Dombivali News : मूक आणि अंध महिलेला जागरुक प्रवाशामुळे मिळाली पर्स

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर एक बेवारस पर्स एका जागरुक नागरिकास आढळून आली.
dumb and blind women purse receive
dumb and blind women purse receivesakal
Updated on
Summary

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर एक बेवारस पर्स एका जागरुक नागरिकास आढळून आली.

डोंबिवली - डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर एक बेवारस पर्स एका जागरुक नागरिकास आढळून आली. त्याने याविषयी रेल्वे पोलिस व स्थानक व्यवस्थापकांना माहिती दिली. पोलिसांनी पर्स तपासली असता सदर पर्स एका अंध महिलेची असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाली. सदर महिलेचा शोध घेऊन रेल्वे पोलिसांनी सदर महिलेला तिची पर्स व दोन मोबाईल तिला परत केले आहेत.

डोंबिवलीतील रहिवासी श्रीकांत खुपेरकर हे सोमवारी उल्हासनगर येथून डोंबिवलीतील फलाट क्रमांक 5 वर उतरले. यावेळी तेथील एका बाकड्यावर एका महिलेची पर्स पडलेली त्यांना दिसली. त्यांनी उपस्थित प्रवाशांना पर्स कोणाची याविषयी विचारणा केली. त्यावर कोणीही प्रतिसाद न दिल्याने त्यांनी याविषयी माहिती सहाय्यक रेल्वे स्थानक व्यवस्थापक संतलाल यांना दिली. त्यांनी याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना देण्यात आली. त्यांनी पर्सची पाहणी करुन ती पर्स सहाय्यक स्थानक व्यवस्थापक संतलाल यांच्या ताब्यात दिली. त्यामध्ये दोन मोबाईल आणि एक मंगळसूत्र होते. पोलिसांनी सदर महिलेचा शोध सुरु केला असता दादर रेल्वे पोलिस ठाण्यातून डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात फोन आला.

डोंबिवलीतील एका मूक आणि अंध महिला तिची पर्स डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर विसरली आहे. तिच्यासोबत तिचा मूक पती आहे. ते अहमदाबाद येथे चालले आहेत. मुकी महिला दादर पोलिसांना पर्स हरविल्याची माहिती खुणा करून देत होती. त्यांना काही वेळ नक्की काय झाले आहे हे कळत नव्हते. अखेर पोलिसांनी तक्रारदार महिला दीपाली झेंडे यांच्याकडून खुणांच्या साहाय्याने सगळी माहिती घेतली. महिलेची पर्स हरवल्याची माहिती पोलिसांना समजली.

डोंबिवलीचे साहाय्यक स्थानक व्यवस्थापक लाल यांनी महिला आणि तिच्या पतीने डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊन पर्सचा ताबा घ्यावा. अन्य कोणाच्याही ताब्यात ही पर्स दिली जाणार नाही, असे सांगितले. मूक महिला झेंडे हिने पतीसह रात्री नऊ वाजताच्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकात येऊन साहाय्यक व्यवस्थापक लाल आणि रेल्वे पोलिसांच्या उपस्थितीत पर्सचा ताबा घेतला. जागरूक प्रवासी खुपेरकर यांच्यामुळे पर्स आणि त्यामधील ऐवज मिळाल्यामुळे झेंडे दाम्पत्याने त्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com