
डोंबिवली : महावितरण कर्मचारी महिलेस मारहाण करणारा अटकेत
डोंबिवली : वीजबिल थकविले (Electricity bill dues) म्हणून मीटर काढून घेऊन जाणाऱ्या महावितरणच्या कर्मचारी महिलेस (Female employee of MSEB) मारहाण करून मीटर हिसकावून घेऊन गेल्याची घटना कल्याण पूर्वेत दुपारी घडली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi police station) गुन्हा दाखल (Police complaint filed) करण्यात आला होता. मोहनदास नायर (वय 53) असे अटक (Mohandas Nair arrested) आरोपीचे नाव आहे.
महावितरणच्या काटेमानवली शाखेत कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ सविता काटे या त्यांच्या सहकारी विद्युत सहायक पल्लवी टोळे यांच्यासह काटेमानवली नाका परिसरात वीजबिल वसुली व वीजपुरवठा खंडित करण्याचे काम करत होत्या. थकबाकीपोटी त्यांनी चिंचपाडा रोडवरील मारवाडी चाळ येथे किरण लालवाणी यांच्या गाळा क्रमांक एकचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढले. यावेळी मोहनदास याने महिला कर्मचाऱ्यांना मीटर का काढले असा जाब विचारत शिवागाळ केली. तसेच सविता यांचे केस पकडून मारहाण करत मीटर हिसकावून पळ काढला होता.
याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नायर याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा, कर्मचाऱ्याला मारहाण, धमकावणे व वैध कारणाने सरकारी मालमत्ता ताब्यात घेण्यास विरोध असा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोळसेवाडी पोलिसांनी नायर याला अटक केली असून पोलिस उपनिरिक्षक मल्लिनाथ डोके हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.