डोंबिवली : भर रस्त्यात एकास लाकडी दांडक्याने मारहाण; गुन्हा दाखल | Dombivali crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police fir

डोंबिवली : भर रस्त्यात एकास लाकडी दांडक्याने मारहाण; गुन्हा दाखल

डोंबिवली : डोंबिवली (Dombivali) पश्चिमेत देवीचा पाडा येथे राहणारे काशीनाथ भोईर (Kashinath bhoir) वय (42) यांना तिघांनी भर रस्त्यात पहारा ठेवून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना (beating incident) सोमवारी घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस (vishnu nagar police) ठाण्यात गुन्हा दाखल (Police FIR) करण्यात आला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद (cctv footage) झाला आहे.

डोंबिवली पश्चिमेत तुळशी स्मृती येथे राहणारे भोईर हे सोमवारी सोसायटीची वार्षिक सभा असल्याने रात्री 8.30 ला सत्यवान चौकातून श्रेयस हाईट्स येथे निघाले होते. गजानन आर्कड येथे त्यांची दुचाकी आली असता पाठीमागून आलेल्या तिघांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला.

या मारहाणीत त्यांच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार लागला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून त्याआधारे विष्णुनगर पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. काशीनाथ हे एका माजी नगरसेवकासाठी काम करतात. निवडणूका जवळ आल्याअसून भर रस्त्यात काशीनाथ यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे निवडणुकी पूर्वी दहशत निर्माण करण्यासाठी केला गेलेला हल्ला आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :dombivalicrime update