मुंबई काँग्रेसमधली भांडण, भाई जगतापांची थेट सोनिया गांधींकडे तक्रार | Congress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई काँग्रेसमधली भांडण, भाई जगतापांची थेट सोनिया गांधींकडे तक्रार

मुंबई काँग्रेसमधली भांडण, भाई जगतापांची थेट सोनिया गांधींकडे तक्रार

मुंबई: पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक (Bmc election) काँग्रेस (Congress) पूर्ण ताकतीनिशी लढवणार आहे. त्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस रणनितीदेखील आखत आहे. पण त्याचवेळी पक्षांतर्गत मतभेद देखील वाढत चालले आहेत. मुंबई काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

वांद्रयातील काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी भाई जगताप यांची सोनिया गांधींकडे तक्रार केली आहे. मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळातून आपलं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. जेव्हा आपण शिष्टमंडळात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपला जाहीर अपमान केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा: चित्र काढताना बोरिवलीतल्या हेत्वीसोबत घडली दुर्देवी घटना

'आमदार असो कोणी असो इथून चालता हो' अशी भाषा वापरल्याचा पत्रात उल्लेख आहे. आपण याबाबत तिथेच भाई जगताप यांना विचारणा केली असता आपला पुन्हा अपमान करण्यात आल्याचं पत्रात म्हटलं आहे. मी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष असताना चारचौघात आपला अपमान केला असं सिद्दिकी यांचं म्हणणं आहे. भाई जगताप आणि झिशान सिद्दिकी यांच्यात यापूर्वी सुद्धा वाद झाले आहेत.

loading image
go to top