डोंबिवली : वृद्धाने केला 9 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग; आरोपी गजाआड | Dombivali crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Culprit arrested

डोंबिवली : वृद्धाने केला 9 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग; आरोपी गजाआड

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली (Dombivali) पश्चिमेत एका सोसायटीत राहणाऱ्या वृद्धाने 9 वर्षीय मुलीला लाईटचे झुंबर दाखविण्याच्या बहाण्याने घरी नेत तिच्यावर अतिप्रसंग (Minor girl molestation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात (vishnunagar police) गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक (culprit arrested) केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

हेही वाचा: 'नेत्यासोबत सेक्ससाठी मला भाग पाडलं', दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीचा खुलासा

डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या एका 59 वर्षीय व्यक्तीने त्याच्याच सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका 9 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. आरोपी हा सोसायटी मध्ये पाणी सोडायचे काम करत असल्याने त्याची सोसायटीतील प्रत्येकाशी चांगली ओळख आहे. रविवारी दुपारी पीडित मुलीला त्याने लाईटचे झुंबर दाखविण्याच्या बहाण्याने घरी नेले. तेथे चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केला.

पीडित मुलीने घाबरून घरी गेल्यावर आई वडिलांना हा प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडणे यांच्या पथकाने गुप्त बातमीच्या आधारे आरोपीला चार तासात मोठागाव खाडी येथून अटक केली.

loading image
go to top