'हाय-प्रोफाईल व्यक्तींसोबत सेक्ससाठी मला भाग पाडलं', दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीचा खुलासा | Dawood ibrahim | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

'नेत्यासोबत सेक्ससाठी मला भाग पाडलं', दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीचा खुलासा

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood ibrahim) कथित सहकारी रियाज भाटीवर (Riaz bhati) त्याच्या पत्नीने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पतीने आपल्याला त्याचे बिझनेस पार्टनर्स आणि अन्य हाय-प्रोफाईल व्यक्तींसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडले, असा आरोप तिने केला आहे. मुंबई पोलिसांकडे (Mumbai police) तिने एक अर्ज केला आहे. त्यात तिने बलात्काराचा (Rape) आरोप करताना एका क्रीडापटू आणि राजकीय नेत्याचे नाव घेतले आहे.

२४ सप्टेंबर २०२१ या तारखेला हा अर्ज केला आहे. तिने विशिष्ट कुठली तारीख, पत्ता किंवा ठिकाण जिथे या सर्व गोष्टी घडल्या, ते नमूद केलेले नाही. "पोलिसांनी FIR नोंदवावा, यासाठी मी प्रयत्न करतोय. पण ते सहकार्य करत नाहीयत. मी सप्टेंबर महिन्यात अर्ज दिला आहे. आता नोव्हेंबर महिना उजाडला असे तिने सांगितले. मी अनेकवेळा वेगवेगळ्या पोलिसांशी संपर्क साधला. माझ्याकडे पैशाची मागणी करण्याता आली. पण मी भ्रष्टाचाराला का खतपाणी घालू? मी माझ्या ठिकाणी योग्य आहे" असे तिने म्हटले आहे. 'द प्रिंट'ने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: पतीवर गुन्हेगारी कृत्याचे सिद्ध न होणारे आरोप करणे क्रूरताच - हायकोर्ट

रियाज भाटीच्या पत्नीचा अर्ज मिळाल्याचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंघे यांनी सांगितलं. पण सध्याच्या घडीला सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. "आम्ही आणखी माहिती उघड करु शकत नाही. आम्ही चौकशीच्या प्रक्रियेमध्ये आहोत" असे सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

हेही वाचा: विधान परिषदेवर रामदास कदम यांच्याजागी वरुण सरदेसाई की, सचिन अहिर?

रियाज भाटीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. खंडणी, फसवणूक आणि जमीन बळकावणे असे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणीच्या एफआयआरमध्ये रियाजचे नाव आहे.

loading image
go to top