डोंबिवली : धावत्या लोकलमधून मोबाईल हिसकावणारा चोरटा गजाआड | Dombivali crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief arrested

डोंबिवली : धावत्या लोकलमधून मोबाईल हिसकावणारा चोरटा गजाआड

डोंबिवली : लोकलमधील प्रवाशांचा मोबाईल हिसकावून (Mobile robbery) पळ काढणाऱ्या चोरट्यास कल्याण आरपीएफ (Kalyan RPF) जवानांनी पाठलाग करुन पकडले (thief arrested) आहे. रामनजली करुड (Ramnajali karud) असे चोरट्याचे नाव असून, त्याच्या विरोधात मोबाईल हिसकाविण्याचे 15 गुन्हे दाखल (Police FIR) आहेत.

हेही वाचा: मुंबईत ४.७५ लाख लाभार्थ्यांनी चुकवला दुसरा डोस; वाचा सविस्तर माहिती

लोकल सुरू होताच प्रवाशांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. डोंबिवली नंतर आता कल्याण आरपीएफ जवानांनी एका सराईत चोरट्यास पाठलाग करून पकडले आहे. कुर्ला ते बदलापूर लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारा प्रमोद निशाद हा प्रवासी 23 नोव्हेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास कल्याण स्थानकात येत होता.

स्थानकात गाडी थांबताच गाडीतच बसलेल्या एका चोरटय़ाने प्रमोद यांच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून पळ काढला. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर उभ्या असलेल्या आरपीएफ जवानांनी चोरटय़ाला पळत जात असताना पाहिले. त्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला. या चोरटय़ाला रेल्वे यार्डातून ताब्यात घेण्यात आले.

"रामनजली हा सराईत चोरटा असून त्याच्याविरोधात मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकात चोरी केल्या प्रकरणी पंधरा गुन्हे दाखल आहेत. यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे व इतर तपास सुरू आहे."

- पंढरी कांदे, पोलीस निरीक्षक, कल्याण जीआरपी

loading image
go to top