मुंबईत ४.७५ लाख लाभार्थ्यांनी चुकवला दुसरा डोस; वाचा सविस्तर माहिती | Mumbai vaccination update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

मुंबईत ४.७५ लाख लाभार्थ्यांनी चुकवला दुसरा डोस; वाचा सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईत (Mumbai) , कोरोना लसीचा पहिला डोस (First vaccination dose) घेतलेल्या सुमारे पावणे पाच लाख लाभार्थ्यांचा दुसरा डोस चुकला (missing second dose) आहे. त्यांचा शोध घेण्याचे काम प्रभाग स्तरावर बांधण्यात आलेल्या वॉर रूमवर सोपवण्यात आले आहे. आत्तापर्यंत केलेल्या कॉल्स आणि घरोघरी जाऊन राबवलेल्या शोध मोहिमेतून (people search campaign) यापैकी 50 हजार लाभार्थ्यांनी मुंबईबाहेर दुसरा डोस (second dose taken outside Mumbai) घेतल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: BMC ला कोरोनाकाळात जागा न देणाऱ्या पंचतारांकित हॉटेल्सना करसवलत का ?

मुंबईत सध्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीकरण केंद्रांवरील गर्दी आता नाहीशी झाली आहे. लसीकरण कमी होण्याचे प्रमुख कारण लाभार्थी लसीकरण केंद्रांवर पोहोचत नसल्याचे सांगितले जात आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, मुंबईत असे सुमारे 4 लाख 73 हजार लाभार्थी आहेत जे पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोसचा कालावधी उलटूनही लस घेण्यासाठी केंद्रावर पोहोचलेले नाहीत. 

जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रावर पोहोचले नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांना शोधण्याचे काम प्रभाग वॉर्ड रूमवर सोपवण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात 20 ते 23 हजार लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी आलेले नाहीत. सुरुवातीला सर्व लाभार्थ्यांशी त्यांच्या मोबाईलवरून संपर्क साधला जात आहे. आतापर्यंत 24 वॉर्डांमध्ये झालेल्या संपर्कांपैकी 50,000 लाभार्थींपैकी बहुतांश लाभार्थ्यांनी मुंबईबाहेरील लसीकरण केंद्रांवर दुसरा डोस घेतला आहे. तर  वाॅर रुमकडून जवळपास साडे चार लाख लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे.

हेही वाचा: शहापूर : ग्रामसेवकाला लाच घेताना अटक

पुरावे नसलेल्या 9 हजारांहून अधिक नागरिकांना डोस

कोविडची लस मिळवण्यासाठी आधार, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड यापैकी एक पुरावा आवश्यक आहे, परंतु मुंबईत असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे कोणतेही प्रमाणपत्र नाही. लसीकरणाच्या सुरुवातीला पुराव्याशिवाय लोकांना लस दिली जात नव्हती. यानंतर मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोविडपासून वाचवण्यासाठी पालिकेने योजना आखली. विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत अशा लोकांनाही लसीकरण करण्यात आले ज्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. अनाथाश्रम, तृतीयपंथी, देह विक्री करणाऱ्या महिला, कैदी आणि रस्त्यावर राहणाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले.

काकाणी यांनी सांगितले की, प्रमाणपत्राशिवाय लोकांना लसीकरण करणे देखील एक आव्हान होते, परंतु आम्हाला प्रत्येकाचे संरक्षण करायचे आहे, या उद्देशाने आम्ही या लोकांना लसीकरण करण्यास सुरुवात केली. सुमारे 3 महिन्यांत 9 हजारांहून अधिक लोकांना लसीकरण करण्यात आले आहे.

दिव्यांग आणि मानसिक आजाराने त्रस्त असलेल्यांनाही लाभ

पालिकेने दिव्यांग आणि मानसिक विकार असलेल्या लोकांसाठी विशेष लसीकरण मोहीम देखील सुरू केली. पालिकेने आतापर्यंत सुमारे 8 हजार दिव्यांग आणि मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना लसीकरण केले आहे. यापैकी 4900 पेक्षा जास्त लोकांनी पहिला डोस आणि 2800 पेक्षा जास्त लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.

loading image
go to top