esakal | डोंबिवली : चाकू हल्ल्यात तरुणाचा मृत्यू | Dombivali
sakal

बोलून बातमी शोधा

knife attack

डोंबिवली : चाकू हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : दारूच्या पार्टीत झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्यावर चाकूने वार केल्याची घटना कल्याण (kalyan) पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरात गुरुवारी रात्री घडली. हल्ल्यात मुकेश देसाईकर (वय २२) याचा मृत्यू (Death) झाला असून, आरोपी शेरखान गुलामउद्दीन खान (३१) हा पसार झाला आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात (Khadakpada police) याप्रकरणी गुन्हा दाखल (FIR) केला आहे.

हेही वाचा: सीएट टायर्सकडून नव्या स्वरूपातील सीएट शॉपीज

शेरखान याचा शोध घेतला जात आहे. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रात्री दारूची पार्टी करत असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला. यात शेरखानने मुकेशवर चॉपरने वार करून तेथून पळून गेला. गंभीर जखमी मुकेशला खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

loading image
go to top