esakal | सीएट टायर्सकडून नव्या स्वरूपातील सीएट शॉपीज | CEAT Tyre
sakal

बोलून बातमी शोधा

Tyre

सीएट टायर्सकडून नव्या स्वरूपातील सीएट शॉपीज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सीएट टायर्स (CEAT Tyre) हा भारताचा अग्रेसर टायर निर्माता असून त्यांनी ग्राहक अनुभव वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने सीएट शॉपी नेटवर्कला नवीन रंगरूप चढविण्याचे निश्चित केले. या शॉपी नेटवर्कद्वारे महत्त्वपूर्ण रिटेल अनुभव (retail experience) उपलब्ध करून देण्यात येईल. या सुविधा केंद्रांतील नवीन स्थापत्यकला सीएटच्या दरदिवशी सुरक्षित दळणवळण आणि स्मार्ट करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. सीएट टायरद्वारे त्यांचे रिटेल चॅनल राष्ट्रीय पातळीवर (national level) नव्या रुपात सादर होणार आहे. आगामी काळात महत्त्वाच्या बाजारपेठा आणि उपनगरांत १० नवीन डिझाईन स्टोअर सुरू करण्यात येतील.

हेही वाचा: Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढली; आज 532 नवे रुग्ण

सध्याच्या सर्वच दालनांना नवा साज चढविण्याची सीएटची योजना आहे. तसेच सध्याच्या वित्तीय वर्षात अतिरिक्त ५० स्टोअर लॉन्च करण्यात येतील. २०२३ पर्यंत ५०० विशेष स्टोअर्सचे लक्ष्य समोर ठेवण्यात आले असून त्यामुळे भारतामधील एक सर्वात मोठे टायर डिलरशीप नेटवर्क उभे राहील. सीएट शॉपीजच्या खास ब्रँडेड आउटलेट्समध्ये ग्राहकांना अस्सल उत्पादने आणि सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा सीएट द्वारे देऊ करण्यात येणार आहेत.

उद्योग क्षेत्रात प्रथमत: अशा प्रकारचे नवनिर्माण सीएट शॉपीजच्या माध्यमातून घडते आहे, या शॉपी अत्याधुनिक सोयी-सुविधांनी आणि आगामी काळातील रिटेल डिझाईनने युक्त असून त्या द्वारे वृद्धिंगत ग्राहक अनुभव मिळणार आहे. यामध्ये औद्योगिक रंग आणि साहित्य जसे की, करड्या रंग छटा, परफॉरर्टेट मेटल, अॅल्युमिनियम प्रोफाईल, मेटल पार्टीशियन इत्यादीचा मिश्र वापर करण्यात येईल. यामुळे सीएट ची उत्पादने मजबूत, दणकट, सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्यावर शिक्कामोर्तब होण्यास हातभार लागेल. विशेष, उबदार प्रकाश साहित्याने दालनांना आणि एकंदर अनुभवाला आवश्यक ती खोली प्राप्त होईल. सीएट शॉपीजचे डिझाईन शाश्वत घटकाला नजरेसमोर ठेवून करण्यात आले आहे. याकरिता निवडण्यात आलेले साहित्य दीर्घकाळ चालणारे असून उभारणी कमी वेळेत शक्य होईल. त्याचप्रमाणे देखभाल खर्चही फार नसेल.

हेही वाचा: बेस्ट चालक आता भाड्याने देणार; कामगार संघटनांचा मात्र निर्णयाला विरोध

ताजी आणि अत्याधुनिक डिझाईन मनोरंजक आणि गुंतवून ठेवणारा डिजिटल अनुभव देईल. ग्राहकांना टायरसोबत संवाद साधता येईल, याप्रमाणे डिस्प्लेची नवीन रचना निश्चित केली आहे. सीएट शॉपीजला सर्विस सेंटरची सोय असल्याने याठिकाणी वॉरंटी नोंदणी, ‘ऑन-स्पॉट क्लेम सेटलमेंट, कस्टमर फीडबॅक मशीनिझम (एनपीएस) आणि सर्विस रिमाइंडर यासारख्या सर्व ग्राहक गरजांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

शॉपीच्या नवीन डिझाईनचे उद्दिष्ट प्रेरणादायक आणि महत्त्वाकांक्षी असून मध्यंतरीच्या काळात उत्पादने, संकल्पना आणि डिस्प्ले प्रगत झाल्याने त्यांना नवीन रूप देऊन ग्राहक अनुभव वृद्धिंगत करायचा आहे. या नवीन प्रगतीवर बोलताना सीएट लिमिटेडचे सीओओ अर्नब बॅनर्जी म्हणाले की, “या नव्या ढंगात तयार होत असलेल्या सीएट शॉपीज ग्राहकांकरिता महत्त्वाच्या टचपॉइंट म्हणून काम करणार आहेत. भारतात यापूर्वी कधीही न पाहिलेला अनुभव उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

एकंदर स्टोअरचे उद्दिष्ट हे तद्दन औद्योगिक रूप आणि आटोपशीर सुबक जीवनशैली परिघातील संतुलन राखण्याचे आहे. दालनातील प्रत्येक घटक हा डिझाईन केलेला आणि नवनिर्मितीचा स्पर्श लाभलेला असणार आहे. सर्वच सीएट शॉपी नवीन डिझाईननुरूप तयार करण्याची आमची योजना आहे.” सध्या भारताच्या शहरांमधील सीएट शॉपीजचे क्षेत्रफळ सुमारे ७५० ते २५०० चौरस फूट याप्रमाणे आहे.

loading image
go to top