उद्योजकांनी पुकारला बेमुदत बंद! वाचा नेमकं काय झालं...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील २१ कारखान्यांना उत्पादन बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शासकीय यंत्रणांनी एकाच वेळी या परिसरातील उद्योगांवर कारवाई करण्याचे धोरण अवलंबल्यामुळे या अन्यायाविरोधात डोंबिवलीतील उद्योजकांनी कामगारांसह बेमुदत बंदचे आंदोलन सुरू केले आहे.

कल्याण : डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील २१ कारखान्यांना उत्पादन बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शासकीय यंत्रणांनी एकाच वेळी या परिसरातील उद्योगांवर कारवाई करण्याचे धोरण अवलंबल्यामुळे या अन्यायाविरोधात डोंबिवलीतील उद्योजकांनी कामगारांसह बेमुदत बंदचे आंदोलन सुरू केले आहे. त्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत याबाबत चर्चा करण्याचे प्रयत्न उद्योजक संघटनेच्या माध्यमातून होत आहेत.

ही बातमी वाचली का?...आता ऐतिहासिक किल्ल्यांवर पोलिसांचा पहारा!

विविध रंगांचा पाऊस, गुलाबी रस्ते, सततच्या आगीच्या घटना यांसारखे प्रकार डोंबिवलीत समोर येत होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांनी कारखान्यांना टाळे ठोकावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रदूषणकारी कारखाने बंद करण्यात येतील, असे स्पष्ट संकेतही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही उद्योगांच्या थकीत मालमत्ता करासाठी नोटीस पाठवली आहे. तसेच औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर आराखड्यापेक्षा अधिकचे बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सरकारी यंत्रणांकडून होत असलेल्या या अन्यायाविरोधात उद्योजकांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. 

ही बातमी वाचली का? मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द, कारण आहे...

डोंबिवलीत प्रदूषणाचे प्रमाण कमी असावे. यासाठी उद्योजक कायमच प्रयत्नशील आहेत; परंतु विविध सरकारी विभागांनी एकाच वेळी कारवाई सुरू करत कारखान्यांना स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी दिलेली नाही, अशी संधी न देणे हा उद्योगांवर अन्याय आहे. 
- देवेन सोनी, अध्यक्ष, कल्याण-डोंबिवली मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dombivali entrepreneurs call for timeless shutdown due to injustice on government machinery