...आता ऐतिहासिक किल्ल्यांवर पोलिसांचा पहारा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

गड-किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे, गैरवर्तन करणे अशा प्रकरणांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश गृह खात्याने पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील वांद्रे, शिवडी, सायन, माहीम, कुलाबा, वरळी या किल्ल्यांवर पोलिसांचा पहारा असेल.

मुंबई : गड-किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे, गैरवर्तन करणे अशा प्रकरणांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश गृह खात्याने पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्यामुळे मुंबईतील वांद्रे, शिवडी, सायन, माहीम, कुलाबा, वरळी या किल्ल्यांवर पोलिसांचा पहारा असेल. गुन्हा सिद्ध झाल्यास हुल्लडबाजांना सहा महिने सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.

ही बातमी वाचली का? मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द, कारण आहे...

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गड-किल्ले भाड्याने देण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत सर्वसामान्यांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. गड-किल्ले म्हणजे मराठी स्वराज्याच्या शौर्याची प्रतीके आहेत. परंतु नववर्ष स्वागत आणि वाढदिवस साजरे करण्यासाठी तरुण गड-किल्ल्यांवर जाऊन दारूच्या पार्ट्या करतात. अशा काही जणांना शिवप्रेमींनी चोप दिल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

ही बातमी वाचली का? व्हायरल सत्य! कोरोनामुळे केंद्राने महाराष्ट्रात जाहीर केली सुट्टी?
 
या घटनेची गंभीर दखल घेत अशा ठिकाणी पार्टी, अमली पदार्थांचे सेवन, गैरकृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश गृहखात्याने पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. नियमाचे उल्लघंन करणाऱ्यांवर दारूबंदी आणि पुरातन वास्तूंचे नुकसान अशा दोन्ही कायद्यांतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. त्याबाबत इशारा देणारा फलक प्रत्येक किल्ल्याच्या दर्शनी भागात लावण्याचे आदेश गृह खात्याने दिले आहेत.

ही बातमी वाचली का? मविआ सरकार येताच‘या’प्रस्तावाला मिळतीये तत्काळ मंजुरी!

सरकारच्या आदेशामुळे गड-किल्ल्यांवर नशा आणणारे पदार्थ नेता येणार नाहीत. असे पदार्थ जवळ बाळगणे गुन्हा ठरणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील वांद्रे, 
माहीम, सायन, वरळी, कुलाबा, शिवडी या किल्ल्यांवर आता 
स्थानिक पोलिस जागता पहारा ठेवणार आहेत.

ही बातमी वाचली का? रविवारी हार्बर, पश्‍चिम रेल्वे मार्गावर जम्बो ब्लॉक!

नाकाबंदी आणि गस्त
गैरवर्तन म्हणजे काय, हे स्पष्ट करून सहा महिने सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड अशा शिक्षेची सूचना किल्ल्यांवरील फलकांवर स्पष्टपणे दिली जाणार आहे. शहरे आणि जिल्ह्यांतील पोलिस यंत्रणांना तातडीने या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. किल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी करावी. गस्त नेहमी सुरू ठेवावी, असे आदेशात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the police guard the historic forts in mumbai