esakal | डोंबिवलीत रघुराम सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर आग; जीवितहानी नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Dombivali fire

डोंबिवलीत रघुराम सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर आग; जीवितहानी नाही

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : पूर्वेतील शिवमंदिर रोडवरील रघुराम सोसायटीतील (Raghuram Society) दुसऱ्या मजल्यावरील एका घराला शनिवारी रात्री 8 च्या सुमारास आग (fire in house) लागल्याची घटना घडली. सोसायटीतील रहिवाशांनी अग्निशमन दलास आगीची माहिती देताच अग्निशमन दलाच्या गाड्या (fire brigade) घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी (No casualties) टळली.

हेही वाचा: खासगी केंद्रात कोरोना लसीकरणाला वेग; आठवड्याभरात 55 टक्के हिस्सा

रामनगर परिसरातील रघुराम सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील घरात रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. घरातून धूर येऊ लागल्याने तसेच घरास कुलूप असल्याने सोसायटीतील केतन यांनी त्वरित अग्निशमन दलास आगीची माहिती दिली. सोसायटीतील रहिवाशी ही प्रसंगावधान राखत सोसायटीतून बाहेर पडले. अग्निशमन दलाची एक गाडी त्वरित घटनास्थळी दाखल झाली. घराच्या खिडकीच्या काचा फोडून दलाने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्याचे काम सूरु आहे. घरातील सदस्य बाहेर गेले असल्याने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

loading image
go to top