डोंबिवलीत समाधान हॉटेल मॅनेजरवर चाकूने हल्ला; गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Radhesham Singh

काटई बदलापूर पाईपलाईन रोडवरील समाधान हॉटेलचे मॅनेजर राधेशाम सिंग यांच्यावर चाकूने हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.

डोंबिवलीत समाधान हॉटेल मॅनेजरवर चाकूने हल्ला; गुन्हा दाखल

डोंबिवली - काटई बदलापूर पाईपलाईन रोडवरील समाधान हॉटेलचे मॅनेजर राधेशाम सिंग यांच्यावर चाकूने हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. दोघा इसमांनी त्यांची दुचाकी अडवून चाकुने हल्ला करीत त्यांना जखमी करत त्यांच्याकडील महागडा मोबाईल काढून घेऊन हल्लेखोरांनी पोबारा केला आहे. सिंग यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधेशाम सिंग हे कोळेगाव येथे राहण्यास असून समाधान हॉटेलमध्ये ते मॅनेजर म्हणून काम करतात. रविवारी रात्री 12.30 च्या दरम्यान ते हॉटेल बंद केल्यानंतर दुचाकीवरुन आपल्या घरी जात होते. कोळेगावातील गणपती कारखान्या जवळ त्यांची गाडी येताच बदलापूर दिशेने जाणाऱ्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी अडवली.

राधेशाम यांनी गाडी अडविताच त्यातील एका इसमाने धारदार चाकू राधेशाम यांच्या पोटात खुपसला. त्यांना गंभीर जखमी करत त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेत त्यांनी घटना स्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून राधेशाम यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज व इतर गोष्टींच्या आधारे हल्लेखोरांचा तपास मानपाडाचे पोलिस उपनिरिक्षक संजय सहारे करीत आहेत.

Web Title: Dombivali Knief Attack On Samadhan Hotel Manager Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeattackdombivali