
Thane Latest News: कल्याण डोंबिवली शहराला तलावांची नैसर्गिक देणी लाभली असून यातीलच एक तलाव म्हणजे निळजे येथील माऊली तलाव. या तलावाची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली असल्याने त्याचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत हे काम रखडले होते. पर्यटनाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेला माऊली तलावाने कात टाकायला सुरुवात केली आहे. नुकतेच तलावाच्या सुशोभिकरणाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या कामाची पाहणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केली आहे.