डोंबिवली: वाहतूक विभागाची रिक्षाचालकांवर कारवाई | Traffic police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dombivali police

डोंबिवली: वाहतूक विभागाची रिक्षाचालकांवर कारवाई

डोंबिवली : रिक्षा चालकांची (Rikshaw driver) मनमानी ही काही नविन नाही. गणवेश घाला, कागदपत्र जवळ बाळगा, वाहतूक नियम मोडणे (rule breaking) या सूचना वारंवार करूनही रिक्षा चालक त्याचे पालन करत नसल्याने गेल्या चार पाच दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी (traffic police) नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करत दंड वसुली करण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवलीत 200 हून अधिक रिक्षा चालकांवर करण्यात आली असून सुमारे अडीच लाखाची दंड वसुली (fine) करण्यात आली आहे.

हेही वाचा: तळ्याची विटंबना करणाऱ्या तिघांना अटक

उप प्रादेशिक परिवहन विभाग, कल्याण व वाहतूक विभाग डोंबिवली यांच्यावतीने शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात सकाळ संध्याकाळ कारवाई करण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगण्यात हयगय करणे, वाहनतळ सोडून प्रवाशी भाडे आकारणे, गणवेश न वापरणे यांसारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ही कारवाई केली जात आहे.

परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण आणि डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळ पासून डोंबिवली स्टेशन परिसरातील वाहनतळावरील रिक्षाचालकाकडील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. तपासणीमध्ये अनेक रिक्षाचालकांच्या परवान्याची तारीख संपूण अनेक महिने उलटले तरी आरटीओ कार्यालयातून त्याचे नुतनीकरण करून घेतलेले नाही, गणवेश अनेक जण वापरत नाही तर काहींनी भाड्याने रिक्षा चालविण्यास घेतली, मात्र त्यांच्याकडे कागदपत्रे च नव्हती असे रिक्षा चालक आढळून आले आहेत. चार ते पाच दिवसांत 200 हुन अधिक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून अडीच लाखाच्या आसपास दंड वसुली करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गित्ते यांनी दिली.

Web Title: Dombivali News Update Rikshaw Driver Rule Breaking Traffic Police Fine To Drivers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :(rule breaking)
go to top