esakal | डोंबिवली: अपघात रोखण्यासाठी खड्ड्यात ठेवलेली कुंडी घेवून रिक्षाचालक पसार
sakal

बोलून बातमी शोधा

Dombivali pothole

डोंबिवली: अपघात रोखण्यासाठी खड्ड्यात ठेवलेली कुंडी घेवून रिक्षाचालक पसार

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली (Dombivali) शहरात विविध रस्त्यांवर जीवघेणे खड्डे (potholes on road) पडले आहेत. गेले काही दिवस पावसाचीही संततधार (rainfall) सुरू असल्याने खड्डयांत पाणी साचून अपघात होण्याची (Accident possibilities) शक्यता आहे. डोंबिवलीतील न्यू कल्याण रोडवर असाच एक खड्डा असून तिथे वाहनांचे अपघात घडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी येथील जागरूक नागरिक महेश चव्हाण यांनी खड्ड्यात कुंडी (tree pot) ठेवली. जेणेकरून नागरिकांना इथे खड्डा आहे हे समजावे. मात्र एक रिक्षा चालक (Rikshaw driver) ही कुंडी घेऊनच पसार झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Rikshaw

Rikshaw

डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल वरून कल्याण दिशेला जाणार न्यू कल्याण रोड या रसत्यावर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. 90 फिट रोडला जोडणाऱ्या रस्त्या पुढील बाजूस द फूड व्हिलेज हॉटेल समोरील खड्डा ही प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. अनेक वाहनचालक या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यात आदळत आहेत. वाहनचालकांचे अपघात रोखण्यासाठी जागरूक नागरिक महेश चव्हाण यांनी सुरवातीला त्या खड्ड्यात खडी आणून टाकली. मात्र पावसामुळे खडी राहिली नाही. वाहनचालकांना हा खड्डा दिसावा म्हणून नंतर त्यांनी त्या ठिकाणी टायरची ट्यूब ठेवली. पण ती ट्युबही कोणी तरी चोरून नेली.

हेही वाचा: दिवाळीच्या सुमारास 'जिओफोन नेक्स्ट' बाजारात; जिओ गुगलची घोषणा

शनिवारी त्यांनी त्या खड्ड्यात रोपट्याची कुंडी ठेवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. वाहनचालकांना कुंडी दिसेल आणि येथून ते प्रवास करण्याचे टाळतील हा त्यामागचा उद्देश असल्याचे महेश सांगतात. मात्र ही कुंडीही एक रिक्षाचालक घेऊन पसार झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जनजागृतीसाठी लावलेली कुंडी ही चोरून नेल्याने आता काही नागरिकांच्या या कृत्याला काय बोलायचे ? त्या पेक्षा प्रशासनाने हे खड्डे तात्पुरते नाही तर कायम स्वरूपी बुजवावे अशी मागणी महेश हे करतात.

loading image
go to top