
डोंबिवली: मोबाईल विकायला आला अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात; चोरटा अटकेत
डोंबिवली : नागरिकांचे मोबाईल चोरायचे (Mobile robbery) आणि नंतर ते विकायचे असा त्यांचा शिकस्ता सुरू होता. असाच एक चोरीचा मोबाईल शिळफाटा येथे विकायला आला आणि शीळ डायघर पोलिसांच्या (Shil dygher police) जाळ्यात अडकला. राकेश यादव (वय 22) असं अटक केले आरोपीचे नाव (culprit arrested) असून त्याच्या विरोधात मुंबई, ठाणे येथील पोलीस ठाण्यातील 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी 20 मोबाईल, एक मोटारसायकल असा एकूण 1 लाख 61 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Dombivali shil dygher police arrested mobile thief and seized robbed matarial)
हेही वाचा: बिहार : ...अन् अल्पवयीन मुलीनं सहाव्या मजल्यावरुन मारली उडी!
शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळफाटा येथे एक व्यक्ती चोरीचा मोबाईल विकण्याकरीता येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कापडणीस, पोलीस हवालदार हेमंत भामरे, पोलीस नाईक गोविंद पाटील, राकेश सत्रे, सचिन कोळी, सुशांत पाटील, कृष्णा बोराडे, महेंद्र बरफ यांच्या पथकाने 8 जानेवारीला पोलिसांनी शिळफाटा येथे सापळा रचला.
यादरम्यान नंबर प्लेट नसलेल्या एका दुचाकीवर शिळफाटा येथील शिवसेना शाखेजवळील पानटपरीजवळ आला. गुप्त बातमीदाराने केलेल्या इशाऱ्यानुसार पोलीसांनी त्यास घेराव घालून ताब्यात घेतले. मुंब्रा येथे राहणारा राकेश याने पोलीस तपासात साथीदारासह चोरीचे गुन्हे केल्याचं कबूल केलं. घाटकोपर, ठाणे जीआरपी, मुंब्रा, ठाणे रेल्वे, दादर रेल्वे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध असलेले 7 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. राकेशने आणखी गुन्हे केले असल्याची माहिती दिल्यानंतर त्याच्याकडून चोरलेले एकूण 1 लाख 11 हजार किंमतीचे 20 विविध कंपनीचे मोबाईल, 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण 1 लाख 61 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती शीळ डायघर पोलिसांनी दिली.
Web Title: Dombivali Shil Dygher Police Arrested Mobile Thief And Seized Robbed Matarial Crime Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..