esakal | डोंबिवली : ठाकुर्ली समांतर रस्त्यावरील धक्कादायक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डोंबिवली : ठाकुर्ली समांतर रस्त्यावरील धक्कादायक घटना

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : रेल्वे (Railway) समांतर रस्त्यावरून रात्रीच्या सुमारास रिक्षाने जाणाऱ्या दोघांना अडवून जबर मारहाण, चाकूने वार करीत एका प्रवाशाची हत्या व एकाला जखमी केल्याची घटना खंबाळपाडा परिसरात घडली. सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास ही घटना घडली असून बेचन चौहान (वय 32) असे मयत तरुणाचे नाव आहे तर बबलू चौहान (वय 35) जखमी तरुणाचे नाव आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून याप्रकरणी टिळकनगर पोलीस व रेल्वे पोलीस (Police) अधिक तपास करीत आहेत.

डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका परिसरात राहणारे बेचन व बबलू हे पेंटिंग, सुतार काम करतात. गावी उत्तरप्रदेशला त्यांना जायचे होते. कल्याण रेल्वे स्थानकातून दिडची गाडी असल्याने परिसरातून त्यांनी कल्याण ला जाण्यासाठी रात्री 12 च्या सुमारास रिक्षा पकडली. ठाकुर्ली रेल्वे समांतर रस्त्यावर त्यांची रिक्षा काही अनोळखी इसमानी अडवून रिक्षा चालकाला पळवून लावले. बेचन आणि बबलू यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण केली. त्यानंतर रेल्वे रुळांवर त्यांना नेत तेथे त्यांच्यावर चाकूने वार केले. बबलुने तेथून पळ काढला, घर गाठत त्याने प्रथम ही माहिती घरच्यांना दिली. त्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना त्याने सांगितले. त्यांनी जखमीला सोबत घेऊन टिळकनगर पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना याची माहिती दिली.

हेही वाचा: डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे रुळावर दगड; पाहा व्हिडिओ

पोलिसांनी बबलुसोबत जाऊन घटनास्थळी गेले. तेथे बेचनचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आला. तसेच दोघांची बॅग व मोबाईल ही घटनास्थळी पोलिसांना आढळून आले आहेत.

हेही वाचा: वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने साकारला वाचनालयाचा देखावा;पाहा व्हिडिओ

चोरीच्या उद्देशाने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत. घटनेतील रिक्षा चालकाचाही शोध घेतला जात आहे. बेचनची हत्या झाली की रेल्वे अपघात मृत्यू याचा तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज काही प्राप्त होत आहे का या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.

loading image
go to top