दारू पिऊन, सुकी मासळीवर ताव मारून केली चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dombivali Theft

घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे 1 लाख 59 हजाराचा ऐवज चोरला.

Dombivali Theft : दारू पिऊन, सुकी मासळीवर ताव मारून केली चोरी

डोंबिवली - घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील सुमारे 1 लाख 59 हजाराचा ऐवज तर चोरला. परंतू चोरीच्या आधी घराबाहेर बसून दारु पिली, त्यानंतर घरात प्रवेश करत घरातील सुकी मासळी भाजून खाल्ली व चोरी करुन पसार झाले. चोरट्यांची ही अनोखी चोरीचा प्रकार मलंगगड जवळील चिंचवली गावातील एका घरात घडला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

चिंचवली गावातील पाटील कुटुंबीय हे शनिवारी रात्री वसार गावात नातेवाईकांकडे गेले होते. त्याच दरम्यान चोरट्यांनी हटके स्टाईल चोरी केली आहे. चोरांनी पहिले फिर्यादीच्या घराबाहेर दारू पिली, नंतर कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि टेहाळणी केली. यात त्यानां घरात सुखी मासळी दिसली आणि भूक लागली असल्याने त्यांनी ती मासळी भाजून खाल्ली. मग कपाट तोडून घरातील सोन्याचे गंठण, सोन्याचे कानातले दागिने आणि रोख रक्कम असे मिळून तब्बल सुमारे 1 लाख 59 हजाराचा मुद्देमाल चोरुन चोरटा पसार झाला आहे. रविवारी पाटील कुटूंब घरी आले तेव्हा त्यांना कुलूप तोडलेले असल्याचे आढळून आले. घरात पाहणी केली असता घरात चोरी झाल्याची बाब उघड झाली.

तसेच घरात सुकी मासळी भाजलेली आढळून आली व घराच्या आवारात दारुची बाटली देखील आढळून आली आहे. याप्रकरणी पाटिल कुटूंबाने हिललाईन पोलिस ठाण्यात घरफोडीची तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी याचा अधिक तपास सुरु केला आहे.

टॅग्स :crimedombivali