esakal | झाडाची फांदी पडल्याने महावितरणच्या कार्यालयाला लागली गळती
sakal

बोलून बातमी शोधा

Tree collapse

झाडाची फांदी पडल्याने महावितरणच्या कार्यालयाला लागली गळती

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वी (Monsoon) महावितरणकडून (MSEB) झाडांच्या फांद्यांची छाटणी (Trees Cutting) केली जाते. मात्र आपल्याच कार्यालयावर असलेली झाडाची फांदी तोडण्यास महावितरण विसरले आणि या फांदीने घात केलाच. महावितरणच्या आजदे शाखेच्या छताला फांदी पडल्याने (tree collapse) गळती लागली (water leakage) असून सोमवारी या गळक्या कार्यालयात बसूनच कर्मचाऱ्यांना काम करावे लागले.

हेही वाचा: शिरवली गावात गणेशोत्सवात रंगते सारीपाटाची गंमत

गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सूरु आहे. पावसामुळे डोंबिवली एमआयडिसीतील महावितरणच्या आजदे शाखेला गळती लागली असून कार्यालयात जिथे तिथे पाणीच पाणी झाले आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात तर टपटप पाणी गळत आहे. सोमवारी कर्मचाऱ्यांनी कार्यालय उघडताच त्यांना कार्यालयात पाणीच पाणी दिसले. पावसाचे गळणारे पाणी साठविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी टेबलावर बादली ठेवली होती. अशा वातावरणातच त्यांनी सोमवारी दिवसभर काम केले. या शाखेचे नव्यानेच काम करण्यात आले आहे. मात्र तरीही छप्पर पावसात गळू लागल्याने कर्मचारीही आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

याविषयी महावितरण विभागाशी संपर्क साधला असता, कार्यालयावरील झाडाची फांदी तुटल्याने ते छतावर पडून छताचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर जास्त असल्याने कार्यालयात पावसाचे पाणी गळत आहे. पावसाची उघडीप मिळताच दुरुस्ती चे काम करण्यात येईल असे कल्याण झोनचे जनसंपर्क अधिकारी विजय दुधभाटे यांनी सांगितले.

loading image
go to top