esakal | शिरवली गावात गणेशोत्सवात रंगते सारीपाटाची गंमत
sakal

बोलून बातमी शोधा

Saripata Game

शिरवली गावात गणेशोत्सवात रंगते सारीपाटाची गंमत

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : गणेशोत्सवात (Ganpati festival) रात्री जागरण करून गणपती जागवला जातो अशी प्रथा अकाझी ग्रामीण भागात पाळली जात आहे. रात्र जागवण्यासाठी वसई (Vasai) तालुक्यातील शिरवली गावात (Shiravali village) सारीपाटाचा (Saripata Game) डाव मांडला जात असून पालघर जिल्हात याच गावात हा खेळ खेळला जात असल्याने वसईत हा कुतुहालाचा विषय ठरला आहे. तर या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव (corona) असल्याने घराच्या बाहेर जात येत नसल्याने पारंपरिक खेळाची ही परंपरा जपण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी सारीपाटाचा डाव मांडून ही परंपरा जपत आहेत.

हेही वाचा: कासा : ग्रामीण भागात गणेशोत्सवानिमित्त पथनाट्यातून जनजागृती

सारीपाटा बाबत आपल्याला पहिल्यांदा समजले ते महाभारत या मालिकेमुळे महाभारत काळात खेळा जाणारा हा खेळ आजही ग्रामीण भागात जपला असून तो गणपती उत्सवात खेळला जात आहे. महाभारतात खेळला गेलेला सारीपाट(द्यूत ) हा खेळ ज्या खेळाचे दर्शन आताच्या काळात जय मल्हार मालिकेतुन अवघ्या महाराष्ट्राला झाले.तो सारीपाट खेळ गणेशोत्वाच्या दिवसात वसईतील शिरवली या गावात खेळाला जात आहे. मागील 82 वर्षांपासून दर गणेशोत्सवात हा खेळ खेळाला जात असून आजही ही परंपरा सुरू आहे.

महत्वाचे म्हणजे हा खेळ पालघर जिल्हात एकमेव फक्त्त शिरवली गावात व गणेशोत्वातच खेळाला जातो. या खेळासाठी कापडी सारीपाट वापरला जात असून सोंगट्या म्हणून लाकडी सोंगट्यांचा वापर केला जातो .लाकडी सोगटया कापडी पटावर ठेऊन हा खेळ सुरु होतो. तसेच फासे म्हणून कवड्याचा वापर केला जातो. ज्या प्रमाणे खेळाडू कवड्याचे दान घेतो त्या दानानुसार सोगटी पटावर चालवली जाते.

हा खेळ दोन गटात खेळवला जात असल्यामुळे ज्या गटाच्या सोंगट्या सारीपाट़ाच्या मघ्यभागी जातील तो गट विजयी होतो. तर एका गटाने सोगटी मारल्यानंतर दुसऱ्या विरोधी गटाने त्या गटाची सोगटी मारली तर हा खेळ बरोबरीत सूटतो. तर काही वेळा दान जास्त पडल्यामुळे भूत उठते त्या वेळी या खेळाला मोठी गंमत येते.या खेळात एक डाव पूर्ण होण्यासाठी ४ तास लागतात . विशेष म्हणजे या खेळात पैश्याचा वापर केला जात नाही. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व एक उत्सव म्हणून मागील अनेक वर्षा पासून गणपतीत जागर व्हावा म्हणून करमणुकी साठी हा खेळ खेळला जातो. आता आधुनिक काळात तरुणांच्या हातात स्मार्टफोन असताना सुद्धा मोकाशी परिवारातील तरुणांनी ही परंपरा जोपासली आहे.

loading image
go to top