esakal | डोंबिवलीत भाजी विक्रेत्यांमध्ये जुंपली; चौघांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Police FIR

डोंबिवलीत भाजी विक्रेत्यांमध्ये जुंपली; चौघांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली (Dombivali) पूर्वेतील भाजी मार्केट (vegetable market) परिसरात गुरुवारी भाजी विक्रेत्यांमध्ये (vegetable vendors Quarrel) वाद होऊन हाणामारीची घटना घडली. यामध्ये चार जणांनी एकाला लाकडी दांडक्याने व ठोश्याबुक्यांनी मारहाण करीत नाक फोडले आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात (Ramnagar police station) परशुराम मल्याली, जयेश मल्याली, विष्णू मल्याली, सुभाष मल्याली यांच्याविरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.

हेही वाचा: अँटिलिया स्फोटक प्रकरण: NIA कडून १० हजार पानी आरोपपत्र दाखल

छेडा रोडवरील भाजी मार्केट परिसरात गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास कमलाकर पाटील व त्यांच्या पत्नी भाजी विक्रीस बसले होते. त्यांच्या बाजूलाच परशुराम, सुभाष, जयेश व विष्णू हेही भाजी विक्रीस बसले होते. कमलाकर यांच्या पत्नीने चौघांना 'ओरडून भाजी विकू नका' असे सांगितले. यावरून कमलाकर व त्या चौघांत वाद होऊन त्याचे रूपांतर मारामारीत झाले. चौघांनी कमलाकर याना ठोश्या बुक्याने तसेच लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आहे. यामध्ये कमलाकर यांच्या नाकाला दुखापत झाली आहे. डोंबिवलीत यापूर्वीही फेरीवाल्यांमध्ये मारामारीच्या घटना घडल्या आहेत. ठाण्यात फेरीवाल्याने सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यानंतर कल्याण डोंबिवलीतही त्याची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. वाद करणारे चौघेही परप्रांतीय फेरीवाले फरार आहेत.

loading image
go to top