esakal | अँटिलिया स्फोटक प्रकरण: NIA कडून १० हजार पानी आरोपपत्र दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin-Vaze-Pradeep-Sharma

अँटिलिया स्फोटक प्रकरण: NIA कडून १० हजार पानी आरोपपत्र दाखल

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : अॅंटिलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास पथकाने (NIA) आज विशेष न्यायालयात निलंबित पोलीस सचिन वाझे (sachin Waze), एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मासह (pradeep Sharma) दहा जणांविरोधात आरोपपत्र (Charge sheet) दाखल केले. आरोप पत्रांमध्ये दोनशे साक्षीदारांची यादी असून १६४ साक्षीदारांचा जबाब दंडाधिकारी न्यायालयात नोंदवलेला आहे.

कोरोनामुळे एन आय एने आरोपपत्र दाखल करण्यासाठी तीस दिवसांचा जादा अवधी न्यायालयात मागितला होता. ही मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी न्यायालयात आज एनआयएने सुमारे दहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. वाझेसह नरेश गोर, विनायक शिंदे, रियाझ काझी, सुनील माने, संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोतकरी, मनीष सोनी, आणि प्रदीप शर्मा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट मंदिराचा टाळा उघडून केली पूजा

या प्रकरणात तीन एफआयआर दाखल असून स्काॅर्पियो स्फोटक प्रकरण, स्काॅर्पियो गाडी चोरी आणि मनसुख हिरन म्रुत्यु यावर आरोप आहेत. एनआयएने हत्या, कटकारस्थान, अपहरण, धमकी देणे, सामाजिक शांतता भंग करणे, इ. भादंवि कलम 120 ब, 201, 286, 302, 364, 384, 386, 403, 419, 506 इ. यूएपीए अंतर्गत कलम 16, 18, 20 आणि हत्यारे आणि स्फोटके कायद्यानुसार आरोप दाखल केले आहेत.

चालू वर्षी फेब्रुवारीमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कौर्पियो गाडीत जिलेटीनच्या कांड्या आणि धमकिचे पत्र मिळाले होते. या गाडिचा ताबा ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरन यांच्याकडे होता. मात्र मार्चमध्ये त्यांचाही म्रुतदेह ठाणे खाडित आढळला होता. प्रारंभी वाझे मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करीत होता. मात्र एनआयएने तपास सुरू केला आणि या प्रकरणात वाझेलाच प्रमुख आरोपी केले. तसेच पोलीस दलातील अन्य काही जणांसह दहा आरोपी यामध्ये अटकेत आहेत. शर्माला देखील एन आय एने अटक केली असून सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू आहे, असे आरोपपत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आणखी काहीजणांच्या अटकेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

loading image
go to top