डोंबिवली : उच्छाद घालणारे माकड वन विभागाच्या ताब्यात | Dombivali wildlife update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monkey in cage

डोंबिवली : उच्छाद घालणारे माकड वन विभागाच्या ताब्यात

डोंबिवली : कल्याण-शिळ रोडवरील पलावा सिटी (Palava city) परिसरातील लेक शोर परिसरात गेले अनेक दिवस एका माकडाने उच्छाद (Monkey free communication ) मांडला होता. सुरवातीला नागरिकांनी गंमतीने माकडास खाण्यास देत होते. मात्र खाण्यास न मिळाल्यास माकड नागरिकांच्या घरात घुसून उच्छाद घालू लागल्यानंतर नागरिकांना त्याचा त्रास होऊ लागला. नागरिकांनी वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क (toll free number) साधुन त्याला पकडण्याची विनंती केली होती. बुधवारी ते एका नागरिकाच्या घरात घुसले असल्याची माहिती मिळताच वॉर संस्थेच्या सदस्यांनी त्याला पकडून वन विभागाच्या (Forest authorities) ताब्यात दिले आहे.

हेही वाचा: समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख

पलावा सिटी परिसरात गेले काही दिवसांपासून एका माकडाचा वावर आहे. सुरवातीला रहिवासी या माकडास गंमतीने फळे, खाद्य खाण्यास देत होते. खाण्यास मिळत असल्याने माकडाचा अधिवास याच परिसरात वाढला होता. मात्र काही नागरिकांनी ते न दिल्यास माकड जबरदस्ती घरात घुसून अन्नाच्या शोधात घरात नासधुस करीत असे. यामुळे नागरिकांनी भीतीने वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माकडास पकडण्याची विनंती केली होती. वनपाल मच्छिंद्र जाधव, वनरक्षक रोहित भोई, योगेश रिंगने यांनी प्रथम येऊन पाहणी केली होती. माकड जखमी असल्याचे प्रथम निदर्शनास आले होते. वॉर संस्थेचे प्राणीमित्र विशाल कंथारिया यांनी नागरिकांमध्ये जनजागृती देखील केली होती.

येथील स्थानिक रहिवासी फरीदा बरूचा यांच्या घरात बुधवारी दुपारी माकड शिरून नासधूस करत असल्याचे विशाल यांना समजले. त्यांनी तत्काळ वन विभागास संपर्क साधून वॉर संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे, विशाल कंथारिया, सुहास पवार, महेश मोरे, स्वप्नील कांबळे, कुलदीप चिकणकर, यांच्या टीमने जखमी माकडास सुरक्षितरित्या पकडुन वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यांना रहिवासी बिनु अलेक्स आणि सतीश बोर यांनी मदत केली. जखमी माकडाला वैद्यकीय उपचारासाठी तज्ञांकडे पाठवणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी सांगितले आहे.

loading image
go to top