समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख | Sameer wankhede | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख

समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख

मुंबई: मुंबई NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक दररोज गंभीर आरोप करत आहेत. समीर वानखेडे धर्माने मुस्लिम (Muslim religion) आहे. पण त्यांनी ही बाब लपवून ठेवली असा नवाब मलिक यांचा आरोप आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे (Nawab malik) सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू महार असल्याचं कोर्टात सांगितलं आहे.

आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या शाळेचा दाखल सादर केला आहे. त्या दोन्ही दाखल्यात वानखेडे मुस्लिम असल्याचे नमूद केले आहे. या दोन्ही दाखल्यात समीर दाऊद वानखेडे असं नाव देखील आहे.

समीर वानखेडे यांचे सेंट जोसेफ हायस्कुल वडाळा इथे पहिली ते चौथी शिक्षण झाले आहे. शाळा सोडतानाचा त्यांचा दाखला 1989 चा आहे. त्यात समीर दाऊद वानखेडे असं नाव असून धर्म मुस्लिम म्हणून नमूद करण्यात आला आहे.

घर बदलले म्हणून समीर वानखेडे यांनी शाळा बदलली. त्या शाळा सोडण्याच्या दाखल्यातही समीर दाऊद वानखेडे नाव आणि धर्म मुस्लिम असल्याचं नमूद आहे. ही महत्वाची कागदपत्रे समोर आली आहेत. याबाबत आज सुनावणी होणार आहे. सर्व आरोप खोटे असून यात काहीही तथ्य नसल्याचं ज्ञानेश्वर वानखेडे यानी स्पष्ठ केलं आहे. यावेळी त्यांना आपण कायदेशीर उत्तर देऊ असे सांगितलं आहे.

टॅग्स :sameer wankhede