

Dombivli Car Fire
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोड परिसरात अज्ञात इसमांनी कारवर पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ६ मार्चला पहाटे २.५७ वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.