
डोंबिवली : डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना शासनाने न्याय द्यावा, या मागणीसाठी बेकायदा इमारतीमधील नागरिकांनी मंगळवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. मुसळधार पावसात नागरिकांनी हे धरणे आंदोलन सुरू केले असून महिला, पुरूष, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.