Dombivli News: घरातून तीव्र दुर्गंधी, शेजाऱ्यांनी दरवाजा उघडताच बसला मोठा धक्का; ४ दिवस आधीच...

Dombivli Crime Case: डोंबिवलीत एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चार दिवस घरातच मृतदेह पडून असल्यामुळे घरातून येणाऱ्या दुर्गंधीनंतर हे प्रकरण उघडकीस आले.
Dombivli Youth Suicide Case

Dombivli Youth Suicide Case

ESakal

Updated on

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर परिसरात ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली असून या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, संबंधित तरुणाचा मृतदेह तब्बल चार दिवस घरातच पडून होता. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा प्रकार समोर आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com