

Fake Medicine Racket
ESakal
डोंबिवली : उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या ‘टेलमा एएम’ या नामांकित औषधाच्या बनावट गोळ्यांची विक्री करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मुंबई आणि डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या या गैरप्रकारावर मनपाडा पोलीस ठाणे यांनी कारवाई करत दोन बड्या औषध वितरकांना अटक करण्यात आली आहे. यात डोंबिवली मधून पंकज उपाध्याय याला अटक केली असून सुमारे 8 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.