
डोंबिवली : दावडी येथील खदाणी जवळ खेकडे पकडण्यासाठी काही तरुण गेले होते. यावेळी किरण शिंदे हा 24 वर्षीय तरुण आपल्या मित्रांना 'मी त्या कोपऱ्यावर जाऊन येतो' असे म्हणून गेला. मात्र तिथे जाताच त्याचा तोल जाऊन तो पाण्यात बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 7 तासांपासून किरणचा शोध तपास सुरु असून अद्याप शोध लागला नाही. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ पसरली असून किरणच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.