डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरातील गोशाळा येथील प्रकाश विद्यालयासमोर जमा असलेल्या शेणात एक मुलगी फसल्याची घटना मंगळवारी घडली. या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच, जागरुक नागरिकांनी प्रसंगावधान राखत मुलीला सुखरुप बाहेर काढले.