youths joined Maharashtra Navnirman Vidyarthi Sena
ESakal
मुंबई
Dombivli Politics: डोंबिवलीत मनसेची तरुण कार्ड खेळी, ठाकरे ब्रँडवर भरोसा; मनसे पुन्हा अॅक्टिव्ह
MNS: डोंबिवलीत शेकडो तरुण-तरुणींनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला आहे. यामुळे मनसे तरुण कार्ड खेळी खेळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
डोंबिवली : भाजप आणि शिवसेनेतील फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेले डोंबिवलीतील तरुण आता वेगळा पर्याय शोधताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेकडे तरुणांचा ओढा वाढत असून, डोंबिवलीत शेकडो तरुण-तरुणींनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत जाहीर प्रवेश केला. तरुण कार्ड खेळी खेळत डोंबिवलीच्या राजकारणात मनसे पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

