
स्वयंघोषित कथित डोंबिवली किंग रील स्टार सुरेंद्र पाटील याला अखेर ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर डोंबिविलीत लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. यानंतर तो फरार झाला होता. त्याला नाशिक येथून अटक केली असून त्याला आता पुढील तपासासाठी मानपाडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.