

Nigerian Nationals Arrested in Dombivli
ESakal
डोंबिवली : खोणी-पलावा परिसरात डोंबिवली मानपाडा पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या मोठ्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये 24 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पलावा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.