

Dombivli Rajunagar Building Illegal Construction
ESakal
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) हद्दीतील डोंबिवली पश्चिमेच्या राजूनगर परिसरात १४ मजली इमारतीची मंजुरी घेऊन प्रत्यक्षात २१ मजली इमारत उभारण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक विकास म्हात्रे यांनी हा प्रकार उघडकीस आणत संबंधित विकसक, वास्तुविशारद आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. म्हात्रे यांनी याप्रकरणी केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन अधिकृत तक्रार दाखल केली आहे.