
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील रस्त्यांची खड्डे पडून दुरावस्था झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे रिक्षा चालक त्रस्त झाले आहेत. रिक्षा चालक आणि नागरिक यांच्यासमोर दररोजचा प्रवास म्हणजे एक दिव्य ठरत आहे. याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नाही. वातानुकूलित कार्यालयात बसून लाखो रुपये पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना रस्त्यांची अवस्था सुधारण्याची तसदीही वाटत नसल्याचा आरोप करत शुक्रवारी संतप्त रिक्षाचालकांनी प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन छेडले.