
KDMC
ESakal
डोंबिवली : मालमत्ता कर, पाणी पट्टी, महावितरणचे वीज देयक भरणा अशी विविध माध्यमातून शासकीय कर, शुल्क भरणा डोंबिवली शहरातील नागरीक वेळच्या वेळी करत असतात. या कराच्या माध्यमातून केडीएमसी प्रशासनाच्या तिजोरीत भरणा होत असतो. कर भरणा करुनही डोंबिवलीकर मात्र कायम उपेक्षित राहीले आहेत. केडीएमसी प्रशासनाकडून डोंबिवली शहराला कायम सापत्न वागणूक दिली जाते. त्यामुळे एकदाच होऊन जाऊ द्या. डोंबिवली शहराची शासनाने स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी व या शहराचे नागरी समस्यांचे दुखणे कायम स्वरुपी संपुष्टात आणावे, अशी मागणी करणारा फलक सध्या प्रशासनाचे तसेच नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.