

Infrastructure Nightmare: MNS Protest Over Abandoned Subhash Road Work
Sakal
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा परिसरातील सुभाष रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी रविवारी थेट रस्त्यावर बसून उपोषण सुरू केले.