

Dombivli
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील गणेश घाट देवीचापाडा परिसरात स्थानिक रहिवाशांवर हल्ला करून चोरी करण्यात आल्याच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गणेश घाट देवीचापाडा, जगदंबा परिसर, कुंभारखाण पाडा, गोपीनाथ चौक आणि महाराष्ट्र नगर भागात गांजाड्यांची दहशत, वाढत्या चोऱ्या तसेच अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या वतीने ग्रामस्थांची विशेष सभा घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.