

dombivli clash between bjp and shinde shivsena
ESakal
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील पॅनल 29 मध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत असून गेल्या दोन दिवसांपासून येथील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपावर पैसे वाटपाचा आरोप शिंदे गटाने केल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच सोमवारी रात्री 11 च्या दरम्यान पुन्हा दोन्ही पक्ष आमनेसामने आले. तुकारामनगर येथे हा राडा झाला असून यात भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर (वय 47) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यात लोखंडी धारदार हत्याराने वार करण्यात आले असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.